_तिथंच तर आपुल्या पोटाला तुकडा भेटायचाय..._ _चल आटप लौकर, पुढचा गाव गाठायचाय..._ _ये काशे, काय बघतीस त्यास्नी ती आल्याती साळातून..._ _त्यांच्यासारखंच का पैक्याला सोकायचाय..._ _व्हय बा व्हय... मलाबी साळा सिकायची हाय रं..._ _या खेळानी आपुली जिंदगी टिकायची न्हाय रं..._ अगं डोंबाऱ्याच्या पोरटीनं असलं सपान बघायचं नसतं... खेळासाठीच जिंदगी आपली जिंदगीशी खेळायचं नसतं... बा,पोरींसाठी तर लई हायतं सवलती... मोफत शिकशान,वरनं मिळतीया म्हणं शिष्षवरती... बा, मला तुझं नि मायचं नाव मोठं करायचाय... इच्याच्या बिऱ्हाडावानी कशाला भटकायचाय... साळपशीच ठोकू तंबू... कशाला पुढचा गाव गाठायचाय... *©सुमित सरवदे*
Posts
- Get link
- X
- Other Apps
कलाकार कलाकार हा समाजाचा आरसा असतो... जो तो कलाकारात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो... ज्याला जाणिव होते... ते लाईक्स अन् फॉलो करतात... तर कांही जाणूनबुझुन उगाच ट्रोल करतात... सन्मान कधी अपमान कधी हसत हसत स्विकारतो... स्वस्थ बसू देत नाही कला त्याची म्हणूनच तर सारं सहन करतो... मनानं खुप मोठा असतो नका समजू त्याला लाचार... कोणीच नसतं ना आपलं जेंव्हा... धावून येतात हेच कलाकार.