_तिथंच तर आपुल्या पोटाला तुकडा भेटायचाय..._
_चल आटप लौकर, पुढचा गाव गाठायचाय..._
_ये काशे, काय बघतीस त्यास्नी ती आल्याती साळातून..._
_त्यांच्यासारखंच का पैक्याला सोकायचाय..._
_व्हय बा व्हय... मलाबी साळा सिकायची हाय रं..._
_या खेळानी आपुली जिंदगी टिकायची न्हाय रं..._
अगं डोंबाऱ्याच्या पोरटीनं असलं सपान बघायचं नसतं...
खेळासाठीच जिंदगी आपली जिंदगीशी खेळायचं नसतं...
बा,पोरींसाठी तर लई हायतं सवलती...
मोफत शिकशान,वरनं मिळतीया म्हणं शिष्षवरती...
बा, मला तुझं नि मायचं नाव मोठं करायचाय...
इच्याच्या बिऱ्हाडावानी कशाला भटकायचाय...
साळपशीच ठोकू तंबू... कशाला पुढचा गाव गाठायचाय...

*©सुमित सरवदे*

Comments

Popular posts from this blog